NCP Protest : द्या आमच्या रोजगारा ‘ची हमी, बंद करा गुजरातची गुलामी’..! राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादार..! गुजरात तुपाशी..महाराष्ट्र उपाशी..!, गद्दारांना 50 खोके..महाराष्ट्राला धोके.! द्या आमच्या रोजगाराची हमी..बंद करा गुजरातची गुलामी..! अशी जोरदार घोषणबाजी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने (NCP Protest) महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असल्याच्या निषेधार्थ आज (सोमवारी) पिंपरीत आंदोलन केले. याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारण्यासाठी खराळवाडी पोस्ट ऑफीसमधून चार हजार पत्र पाठविण्यात आली आहेत.

महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घातले जात असल्याचा आरोप करत शिंदे-फडवणीस सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात पिंपरीत आंदोलन करण्यात आले.  या अंदोलनात माजी नगरसेवक अरुण बोराडे, प्रकाश सोमवंशी,राजू बनसोडे, राष्ट्रवादी युवकचे  प्रदेश सचिव डॉ. अरुण शिंदे,  पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, मंगेश बजबळकर,अमोल रावलकर, दिनेश पटेल,राहुल पवार,श्याम जगताप,प्रवीण खरात,दीपक गुप्ता,सागर वाघमारे,साहिल शिंदे, रूबान शेख,रोहित मोरे,सुरज पटेल,पियुष अंकुश,बापू कातळे, युवराज पवार,  संगीता कोकणे,मीरा कदम, समिताताई गोरे, दत्तात्रय जगताप, विशाल जाधव,अकबर मुल्ला,कुणाल जगताप,अनिल चव्हाण,इरफान शेख,विकास गाढवे,जितेश पुलवरे, तानाजी जवळकर,सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष समीर थोपटे,मयूर खरात,संकेत जगताप,केतन हुके सहभागी झाले होते.

Pune news : बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी गुरुवारी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, ”शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रसाठी नाही तर गुजरात साठी काम करत आहे. (NCP Protest) या तीन महिन्यात सुमारे महाराष्ट्रातील युवक-युवतींना साडेतीन लाख रोजगार निर्मिती होणारे तीन मोठे प्रकल्प नेमके गुजरात मध्ये का पाठवले जात आहेत.? इतर राज्यात का गेले नाहीत?महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकाँन,बल्क ड्रॅग पार्क व आता टाटा एअरबस हे तिन्ही प्रकल्प गुजरातच्या निवडणुका मोदी यांनी जिंकण्यासाठी मदत म्हणून महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला स्थलांतरीत करीत आहात”.

”यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबावर बेरोजगारीची वेळ तुम्ही आणली असून,महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करून निष्पाप  तरुणांना भोंगे, दहीहंडी, हनुमान चालीसा,दिवे फटाके यामध्ये अडकवून सरकार सोयीचे राजकारण करत आहे. संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील उद्योगधंदे हे शिंदे-फडणवीस सरकार (NCP Protest)  ज्या गतीने गुजरातला पळवत आहे. त्यामुळे एक दिवस असा येईल की महाराष्ट्रातील तरुणांना युपी बिहारमध्ये नोकरी शोधायला जावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रातील युवकांवर आणली जात आहे. याचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले”.

माजी नगरसेवक अरुण बोराडे म्हणाले, ”शरद पवार यांनी पुण्यात आयटी कंपन्यातून महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले. (NCP Protest) आणि हे 50 खोके सरकार आल्यापासून नागरिकांना फक्त धोके देण्याचं काम करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार इतर राज्यात पळवला गेला असून इथल्या युवकांना भीक मागायची वेळ या शिंदे-फडणवीस सरकारने आणली आहे”.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.