NCP : नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने दिलेल्या समर्थनावर शरद पवार म्हणाले..

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात परस्पर विरोधी असलेल्या (NCP) राष्ट्रवादी कॉँग्रेसने नागालँडमध्ये भाजपला समर्थन दिले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागालँडमध्ये भाजपला समर्थन दिले नसून मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप एनडीपीपी युती सरकारला 37 जागा मिळाल्या. यामध्ये 12 जागेवर भाजपला बहुमत मिळाले असून 25 जागेवर एनडीपीपीला जागा मिळाल्या आहेत. येथे राष्ट्रवादीला स्पष्ट 7 जागेचे बहुमत मिळाले असूनही त्यांनी भाजप एनडीपीपी युती सरकारला समर्थन दिले.

PCMC : शास्तीकर समायोजनला महापालिका आयुक्तांचा ‘हिरवा कंदिल’

यावर शरद पवार यांना भाजपला समर्थन का दिले? असा प्रश्न केला असता, आम्ही मुख्यमंत्र्याना समर्थन दिले असून तेथील भाजपला समर्थन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तेथील (NCP) समग्र स्थिती पाहता, तेथील परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना स्थिरता आणण्यासाठी आम्ही समर्थन दिल्याचे म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.