Maval : मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार हद्दपार करतील – बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही धोरण राहिलेले नाही. केवळ पैशाचे जीवावर भाजपने टाकून दिलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमधून हद्दपार करण्याचे काम मतदार या निवडणुकीत करतील, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाल्यानंतर नेवाळे म्हणाले, मी स्वप्नातही भाजपात जाईल, असे वाटले नव्हते. परंतु असे काही प्रसंग येतात आणि वाईट वाटले तरी ठोस निर्णय घ्यावे लागतात. पैसे आणि सामाजिक कार्य पैशापुढे हरते! राष्ट्रवादी पक्षाला धोरण नाही, असे ही ते म्हणाले.

नेवाळे पुढे बोलताना म्हणाले शरद पवार यांना माहीत नाही मी जिल्ह्यात 15 वर्ष काम करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पंधरा वर्षे विकासात्मक काम केले. पण कोणतीही माहिती न घेता ते माझ्यावर टीका करतात. सहकार तत्वावर चालणारी कात्रज दूध संघटना नावारूपास आणली. दूध व्यवसाय गरीब माणसाचे उत्पन्न असून ते साधन असून त्यांचे दुधाला भाव मिळण्यासाठी प्रयत्न केला. राजकारणात प्रामाणिक लोक कमी असून मुख्यमंत्री हे पारदर्शक काम करत असल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता नसून पैशाची घमेंडी असलेल्यालांना मतदारांनी धडा शिकवावा. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like