_MPC_DIR_MPU_III

NCP’s 21st anniversary: पुण्यात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट

NCP's 21st anniversary ​​corona effect on NCP's anniversary in Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी दिली. त्याचे चांगले यश पाहायला मिळाले.

एमपीसी न्यूज- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन म्हटला की धुमधडाक्यात विविध कार्यक्रम करणे, असे नित्यनियमाने ठरलेले असायचे. यावर्षी मात्र, 21 व्या वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येते. पुण्यात कोरोनाचे 8 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. आणि 400 च्या वर यामुळे मृत्यू झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

त्यामुळे रक्तदान, मास्क, सॅनिटायजर, अन्नधान्य वाटप अशा सामाजिक कार्यक्रमांवरच भर देण्यात आला आहे. आज पक्षाच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची ते पाहणी करून कोकणवासीयांना दिलासा देत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या साताऱ्याच्या सभेचा चांगला परिणाम झाला. पुणे शहरात 2014 च्या निवडणुकीत भाजपचे 8 आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत पवार यांची जादू चालून शहरात हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात 2 आमदार निवडून आले.

आता भाजपचे शहरात 6 आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी दिली. त्याचे चांगले यश पाहायला मिळाले. खडकवासला मतदारसंघात विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना नगरसेवक सचिन दोडके यांनी विजय मिळविताना चांगलेच दमछाक केले.

_MPC_DIR_MPU_II

केवळ अडीच हजार मतांनी दोडके पराभूत झाले. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनी विरोधात काम केल्याची खमंग चर्चा आहे. पर्वतीमध्ये नगरसेविका अश्विनी कदम यांनीही चांगली लढत दिली.

या निवडणुकीत पुणे शहरात वडगावशेरी, हडपसर, जिल्ह्यात शिरूर, खेड – आळंदी, मावळ, पिंपरी, जुन्नर हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने खेचून आणले. बारामती, इंदापूर, आंबेगाव मतदारसंघात आधीच राष्ट्रवादीच दबदबा आहे.

आता जिह्यात राष्ट्रवादीचे 10 आमदार झाले आहेत. भाजपचे 9 तर, काँग्रेसचे 2 आमदार आहेत. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक आहेत. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेतही पक्ष खंबीर आहे.

सध्या कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकांचा धडाकाच लावला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.