Pimpri : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कथित भूखंड घोटाळ्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

एमपीसी न्यूज – राज्याचे महसूल मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाचा दुरूपयोग करून बिल्डरधार्जीना निर्णय घेऊन सरकारचा 42 कोटींचा महसूल बुडविल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (शुक्रवारी) सायंकाळी चार वाजता आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे,  नगरसेवक राजू मिसाळ, पंकज भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, सुलक्षणा शिलवंत(धर), युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, लाला चिंचवडे, संजय लंके, अमोल भोईटे, बिपीन नाणेकर, अलोक गायकवाड, मयुर जाधव, सचिन औटे, संजय औसरमल, सनी डहाळे, प्रतिक साळुंके, दिनेश पटेल, कुंदन गोसावी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संजोग वाघेरे म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पदाचा दुरूपयोग करून बिल्डरधार्जीना निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाचा 42 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होईपर्यंत. पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.