_MPC_DIR_MPU_III

Pimpri: मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी)पिंपरीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोघ वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक शाम लांडे, विजय लोखंडे, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, देवी थोरात, शकुंतला भाट, कविता खराडे, मिना मोहिते, अशोक कुंभार, सलीम सय्यद, आनंदा यादव, गंगा धेंडे, शिला भोंडवे, मेघा पवार, शमा सय्यद, मेघना जगताप, बाळासाहेब पिल्लेवार, पोपट पडवळ, सविता खराडे, अभिजीत आल्हाट, ऋषीकेश वाघेरे, प्रशांत वाघेरे, जिमी बोत्रे, विजय दळवी, गोरक्ष पाषाणकर, विक्रम पवार, सुनिल अडागळे सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

भाजपा सरकारच्या काळात देशातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर कोणताही वचक राहिल्या नसल्याचा आरोप करत  संजोघ वाघेरे म्हणाले की, चार दिवसांपूर्वी रमाबाई आंबेडकर, पिंपरी येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून  तिचा निर्घृनपणे खून करण्यात आला. मागील दहा दिवसांपूर्वी कासारसाई हिंजवडी या ठिकाणी उस तोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केला. त्यातील एकीचा मृत्यू झाला आहे. हे सर्व घाणेरडे कृत्य करून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत या सर्व नराधमांची मजल जातेच कशी काय? त्यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही.

या आरोपींना त्वरित पकडून फास्टट्रॅक  कोर्टातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झाला. पोलीस प्रशासन राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा, आरोपही त्यांनी केला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.