Maval News : आमदार सुनील शेळके यांच्यावर भातखळकर यांनी केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे गुरुवारी ‘जोडे मारो आंदोलन’

एमपीसी न्यूज – आमदार सुनील शेळके यांच्यावर अतुल भातखळकर यांनी आरोप केले. याच्या निषेधार्थ मावळ राष्ट्रवादीच्या वतीने वडगाव मावळ येथे भातखळकर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 13) सकाळी साडेअकरा वाजता शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे हे आंदोलन होणार आहे. अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी दिली.

काल मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर झालेले आरोप तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भातखळकर यांच्या प्रतिमेवर जोडो मारो आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार शेळके यांची नाहक बदनामी सहन केली जाणार नाही. तहसीलदार यांनी भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशा आशयाचे निवेदनही देण्यात येणार आहे.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी व कार्यकर्ते यांनी 13 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी बबन भेगडे(अध्यक्ष रा.काँ. मावळ), विठ्ठलराव शिंदे (सदस्यः पुणे जि.नि.स), बापुसाहेब भेगडे (उपाध्यक्षः संत तु.सा.का),सुभाष जाधव (अध्यक्ष रा.काँ. ग्रामीण ब्लॉक मावळ),दिपक हुलावळे (कार्याध्यक्ष रा.काँ. मावळ), सचिन घोटकुले (अध्यक्ष रा.यु.काँ. पुणे जि.), सुवर्णा राऊत(अध्यक्ष रा. महिला काँ. मावळ), सुनिल दाभाडे(अध्यक्ष रा.यु.काँ. मावळ),निशा पवार (अध्यक्ष रा.युवती काँ. मावळ),नवनाथ चोपडे (अध्यक्ष रा.वि.काँ. मावळ), अतुल राऊत (कार्याध्यक्ष रा.काँ. ओबीसी सेल पुणे जि), आफताब सय्यद (अध्यक्ष रा.काँ. अल्पसंख्यांक सेल मावळ),संजय शेडगे ( अध्यक्ष रा काँ सोशल मीडिया) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.