Pimpri: सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर मौन आंदोलन

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी वाढली असून सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या महात्मा गांधी यांच्या जयंतीचेनिमित्त साधत राज्यभरात ‘मौन आंदोलन’  करणार आहे.

याबाबतची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) आकुर्डीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, महात्मा गांधी यांनी सत्य, शांतता, अहिंसेचा संदेश दिला. भाजप सरकारची असत्य, हिंसा, अशांती ही तत्वे आहेत. सरकार फसव्या घोषणा करत आहे. या फसव्या सरकारचा उद्या राज्यभरात शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर नऊ ते बारा या वेळेत मौन आंदोलन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.