Maval : राष्ट्रवादी पक्षातील नेवाळे समर्थकांचा भाजपात प्रवेश

आजी माजी पदाधिकार्‍यांचा समावेश

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने रोज कोणीतरी भाजपावासी होत आहेत. नाणे मावळ राष्ट्रवादीचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य हरिश कोकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल केदारी, कार्याध्यक्ष शाम विकारी, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ गायकवाड, संतोष देवकर, चंद्रकांत घारे या बाळासाहेब नेवाळे समर्थक आजी माजी पदाधिकारी यांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला.


भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये वाकसई येथील संत तुकाराम झाड परिसरात हे प्रवेश झाले. यावेळी बाळासाहेब नेवाळे, माऊली शिंदे, भाऊसाहेब गुंड, जितेंद्र बोत्रे, भाई भरत मोरे, मिलिंद बोत्रे, संभाजी येवले, संजय जायगुडे, मदन नाणेकर, दत्तात्रय पडवळ, मधुकर पडवळ, सचिन येवले, तुळशीराम पिंगळे, केतन खांडेभरड, काळूराम हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब नेवाळे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांनी देखील भाजपवासी होण्याला सुरुवात केल्याने याचे पडसाद येणार्‍या निवडणुकीत उमठणार असून राष्ट्रवादीला याचा फटका बसणार आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like