-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : राष्ट्रवादीचा अतिउत्साहीपणा पुणेकरांच्या अंगलट

सभागृह नेते गणेश बिडकर यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर टिका

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जमवलेली ही गर्दी कोरोनाच्या संकटात भर टाकणारी आहे. त्यांचा अतिउत्साहीपणा पुणेकरांच्या अंगलट येणारा आहे, अशी टिका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केली.

कोरोनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करीत जगताप यांनी जमवलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे. प्रत्येक पुणेकर कोरोना विरोधात लढत असताना, गर्दी जमवण्याचा बालिश प्रकार जगताप यांनी केला आहे. त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी प्रतिक्रीया मुळीक यांनी दिली आहे.

पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना 14 दिवस होम क्वारंटाईन केले पाहिजे, असे वक्तव्य अजित पवार जाहीर कार्यक्रमात सकाळी करतात, आणि संध्याकाळी त्यांच्याच कार्यक्रमात गर्दी जमविली जाते. ही गर्दी पाहून अजित पवारांना जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय ? असे बिडकर यांनी म्हटले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn