Chakan : कामगारांच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा पाठींबा 

माजी आमदार मोहिते यांची माहिती रेकॉल्ड विरोधातील आंदोलन 

एमपीसी न्यूज – रेकॉल्ड कंपनीच्या कामगारांवर होणारा अन्याय निपटून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पयत्न करण्यात येणार आहेत. व्यवस्थापनाची दंडेल शाही खपवून घेतली जाणार नाही, कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठींबा असल्याचे आश्वासन खेडचे माजी दिलीप मोहिते यांनी शनिवारी (दि.४) दिले.      

चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी (ता. खेड ) येथील रेकॉल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेड तथा (अरिस्टन थर्मो ग्रुप ) या वॉटर हिटर उत्पादनातील  बहुराष्ट्रीय कंपनीने सर्व कामगारांना कोणतीही पूर्वसूचना व कोणतीही चर्चा न करता दि. १ नोव्हेंबर, २०१८ पासून बेकायदेशीरपणे कंपनी बंद केली आहे. कंपनी बंद होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही कामगारांना अद्याप न्याय मिळाला नसल्याने कामगार संतप्त झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या कामगारांनी कामगार दिनापासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.

या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी शनिवारी आंदोलन कर्त्या कामगारांची भेट घेतली. सदरच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, अरुण सोमवंशी, व्यंकटेश सोरटे, राम गोरे, संतोष खराबी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.