Wakad : सामना’तील वादग्रस्त अग्रलेखाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांची तक्रार

एमपीसी  न्यूज – माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ तील वादग्रस्त लिखाणाविरोधात दैनिकाचे संपादक आणि मालक यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील युवा नेते संदीप पवार यांनी याबाबत  वाकडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे तक्रार केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत ‘सामना’तून अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार म्हणाले की, आमचे नेते अजितदादावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधील अग्रलेखातून अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. शिवसेना दसरा मेळाव्यातून उध्दव ठाकरे हे आयोध्याला राम मंदीर बांधायला निघाले आहेत. त्यावर अजितदादांनी केवळ अाधी तुमच्या वडिलाचे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधा मग तुम्ही राम मंदीर बांधा, अशी उपरोधिक बोलले होते.

त्यावर उत्तर देण्याएेवजी त्यांनी सामनातून खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे दैनिक सामनातील संपादकासह मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, यापुर्वीही सकल मराठा समाजाने मुक मोर्चाे काढल्यानंतर दैनिक सामनामध्ये मुका मोर्चाे असे व्यंगचित्र काढून हीन दर्जाची टीका केली होती. तेव्हाही मराठा समाज बांधवाच्या भावना दुखावल्या होत्या. यापुढे दैनिक सामनातून खालच्या पातळीवर टीका झाल्यास संपादकांसह शिवसेनेच्या मंत्र्याना पिंपरी चिंचवड शहरात फिरु देणार नाही, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.