Moshi News: मोशी, च-होलीतील पाणी टाकींसाठीही 66 लाखांचा वाढीव खर्चाला स्थायी समितीची बिनभोबाट मान्यता

एमपीसी न्यूज – मोशी, च-होलीतील पाणी टाकींसाठी 66 लाखांचा वाढीव खर्च येणार आहे. या वाढीव खर्चाला स्थायी समितीने बिनभोबाट मान्यता दिली.

मोशी आणि च-होली येथील पाण्याच्या टाकींचे परिचालन करणे आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी जनसेवा स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था यांना 14 सप्टेंबर 2020 रोजी कामाचे आदेश देण्यात आले आहेत. ठेकेदाराने 31 मार्च पर्यंत काम निविदा रकमे इतके पूर्ण केले आहे.

सन 2021-22 च्या मुळ अंदाजपत्रकात या दोन्ही कामांसाठी 48 लाखाची वाढीव तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार, नवीन अंदाजपत्रक तयार करायचे झाल्यास त्या कामाचे आदेश मिळेपर्यंत सप्टेंबर पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

या कामांसाठी वाढीव तरतुद 48 लाख रूपये आणि सुधारीत अंदापत्रकीय 1 कोटी 50 लाख रूपयांच्या मर्यादेत सुधारीत मान्यता घेऊन काम सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक ठरणार आहे. त्यानुसार, सुधारीत अंदाजपत्रकाप्रमाणे या कामासाठी 1 कोटी 29 लाख 93 हजार रूपये इतका खर्च केला जाणार आहे.

त्यामध्ये 48 लाख रूपये इतका वाढीव खर्च होणार आहे. तसेच मोशी, बो-हाडेवाडी येथील पाण्याच्या टाकींचे परिचालन करणे आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी 18 लाख 11 हजार रूपये वाढीव खर्च केला जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आयत्यावेळी स्थायी समिती समोर याबाबतचे प्रस्ताव मांडले. त्यास विनाचर्चा मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.