ND Patil Passed Away : शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन

एमपीसी न्यूज – शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन झाले आहे. कोल्हापूरात उपचारादरम्यान वयाच्या 93 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील अत्यंत धडाडी आणि लढाऊ नेतृत्व म्हणून एन. डी. पाटील यांना ओळखलं जायचं. महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपला अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना लागण झाली होती. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी हे शिक्षण घेतलं होतं. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.