Pune News : पुण्यात एनडीए कॅडेटचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मालदिव येथील हा कॅडेट असून शनिवारी (दि.25) हा प्रकार घडला.

मोहम्मद सुलतान अहमद (वय 21) असे या कॅडेटचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे शनिवारी 12 किलोमीटर जोश रन या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहम्मद याला चक्कर आल्यासारखे झाले आणि तो कोसळला. त्याला तातडीने एनडीए रूग्णालयात दाखल करण्यात आले पण, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाणार असल्याचे एनडीएने म्हटले आहे. तसेच, एनडीए प्रशासनातर्फे चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मालदिव दुतावास यांना देखील याबबात माहिती देण्यात आली असून पोलिसांच्या मदतीने याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एनडीएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.