Boxing world championship 2023 : बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताला तिसरं सुवर्ण; निखत झरीनने पटकावले सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज : भारताच्या निखत झरीनने (Boxing world championship 2023) जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये निखतने व्हिएतनामच्या बॉक्सरचा पराभव केला. तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी ताम हिचा 5-0 ने धुव्वा उडवला. 

निखतकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती आणि तिने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत देशाला पदक जिंकून दिले आहे. अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तिने पहिल्या फेरीत 5-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही तिने आघाडी कायम ठेवली.

Pune Metro : पुणे मेट्रो लवकरच आरटीओ कार्यालय आणि पुणे रेल्वे स्टेशनसह महत्त्वाची ठिकाणे जोडणार

यानंतर तिसऱ्या फेरीत तिने व्हिएतनामच्या बॉक्सरला जोरदार पंच लगावला. यानंतर रेफ्रीने व्हिएतनामी बॉक्सरची प्रकृती जाणून घेण्यासाठी सामना थांबवला. (Boxing world championship 2023) येथून निखतचा विजय निश्चित झाला. अखेरीस, निखतने 5-0 च्या फरकाने सामना जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली.

 

काल नीतू आणि स्वीटीनेही सुवर्णपदक पटकावले

शनिवारी (25 मार्च) नीतू घंघासने 45 ते 48 किलो वजनी गटात मंगोलियन बॉक्सरला हरवून सुवर्णपदक जिंकले. नीतूने मंगोलियाच्या लुत्साईखानचा पराभव केला. (Boxing world championship 2023)  तर स्वीटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 75-81 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. स्वीटीने चीनच्या लीना वॉंगचा पराभव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.