Indori : प्रगती विद्या मंदिर येथे मोफत बाल संस्कार शिबिर सुरु

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर येथे मोफत बालसंस्कार शिबिरास आज (गुरुवारी) सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच दिलीप ढोरे यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनप्रसंगी प्राचार्य दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षक बलभीम भालेराव, शोभा कदम, मच्छिंद्र बारवकर, संजय शिंदे, विजय साळुंखे, गुलाब ढोरे, तुळशीदास सातकर, राजाराम शिंदे, रोहित ढोरे आदी उपस्थित होते. बालवयात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशातून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, सहसचिव नंदकुमार शेलार, शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून अविरत सुरू आहे.

  • प्रशांत भागवत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी जून महिन्यात वृक्षारोपण करून त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करत शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. हे शिबिर 2 मे ते 7 मे या कालावधीत होणार आहे. शिबिरामध्ये योगासने, खेळ, स्पर्धा, चित्रकला, वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक सहल, संगणक हाताळणी, शिवव्याख्यान, पर्यटन स्थळांची माहिती, ई लर्निंग आदी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन समीर गाडे, रुपेश शिंदे, रियाज तांबोळी, मधुकर गुरव यांनी केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मखर यांनी केले. आभार प्राचार्य दशरथ ढमढेरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.