Development of Chakan : चाकणच्या विकासासाठी महानगरपालिकेची गरज – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – चाकण हे मोठे औद्योगीक क्षेत्र असून ते झपाट्याने (Development of Chakan) वाढत आहे. चाकणचा विकास हा योग्य पद्धतीने होणे अपेक्षीत असेल तर चाकण येथे लवकरात लवकर महानगरपालिका होणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवड चे भाग्य चांगले होते की त्यांना दूरदृष्टी  असलेले नेतृत्व लाभले. 1982 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा तेथील लोकसंख्या आणि  कारखानदारी ही सध्याच्या चाकण एम आय डी सी परिसराच्या 5 % सुद्धा नव्हती. तरीसुद्धा त्या काळातील नेत्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. आज पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत असल्याने शहराचा विकास दिसून येत आहे. तसेच महापालिकेमुळे शासनाची भरीव आर्थिक मद्त मिळते.

हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाकणमधील सर्व वाडया, वस्ती व जवळपासची गावे मिळून महानगरपालिका झाली पाहिजे. अन्यथा, या भागाचे बकालीकरण दिवसेंदिवस वाढत जातील. डी. पी. रस्त्यावर लोक अनधिकृत बांधकामे करतील, तिथे अनेक लोक रहायला येतील व त्यानंतर डी. पी. रस्ते विकसित करणे अशक्य होतील. वेळेतच नियोजन करून आज चाकण भागात नवीन चांगल्या शाळा, महाविद्यालय, खेळाचे मैदान, उद्याने व इतर सोईसुविधा निर्माण करणे शक्य आहे. महानगरपालिका आल्यास या भागातील जमीनीला सुद्धा खूप चांगला भाव मिळेल. संबंधित लोक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ह्या संदर्भात जलद गतीने (Development of Chakan) पावले उचलण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी लोकप्रतिनीधींना केले आहे.

BMM2022 : अमेरिकेतील बीएमएम अधिवेशनात पुण्याचे शारंगधर साठे होणार सहभागी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.