Pune : सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी नीलम गोऱ्हे आणि संजय काकडे मैदानात

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पुणे शहरातील वरिष्ठ कामाला लागले असून आज रविवारचा योग साधत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि खासदार संजय काकडे यांनी शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला.

आज ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, पांडव नगर, दीप बंगला चौक या ठिकाणाहून नीलम गो-हे यांची शिरोळे यांच्या प्रचारासाठी प्रचार यात्रा झाली. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पुणे शहराचे माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, आनंद मंजाळकर, ज्योत्स्ना एकबोटे,  स्वाती लोखंडे, सागर धोत्रे, नीता मंजाळकर, अपर्णा कुर्हाडे, दत्ता घोगलू, राजेश धोत्रे, राम म्हेत्रे, किरण ओरसे आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी गोऱ्हे यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शिवाजीनगर मतदार संघातील मतदारांना केले. यानंतर खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली जय जवान नगर नाईक वस्ती येथे बंजारा समाजाच्या तरुणांचा मेळावा देखील घेण्यात आला. यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.

या आधी आज सकाळी सिद्धार्थ शिरोळे यांनी खडकी आणि संगमवाडी येथील दोन गुरुद्वारांना भेट देत आशीर्वाद घेतले. व त्यानंतर फर्ग्यूसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली येथे सिद्धार्थ शिरोळे यांनी नाष्टा करीत सामान्य मतदारांशी संवाद साधला. शिवाजी चव्हाण, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, दत्ता खंडाळे आदी यावेळी उपस्थित होते.

काल रात्री उशिरा जनवाडी पाच पांडव भागातील कोकणी रहिवासी नागरिकांनी सिद्धार्थ शिरोळे यांना आपला पाठींबा जाहीर केला. त्यावेळी संपूर्ण मतदार संघातून कोकणी लोक उपस्थित होते. याबरोबरच खडकी येथील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक देखील पार पडली. यावेळी उपस्थित सर्व प्रमुखांना सिद्धार्थ शिरोळे यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.