Pune : पक्षाने आदेश दिल्यास पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार – नीलम गोऱ्हे 

एमपीसी न्यूज : देशात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विरोधी पक्षांनी भाजप विरोधी मोट बांधण्यास सुरवात केली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. युती न झाल्यास लोकसभेसाठी भाजपचा पारंपरिक असलेल्या पुणे मतदार संघात शिवसेनेकडून उमेदवार देण्यात येणार आहे. पण अशात शिवसेनेचा ‘तो’ चेहरा कोण याचे अनेक कयास बांधले जात आहेत. मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सांगत आमदार नीलम गोऱ्हे यांनी मी देखील या शर्यतीत असल्याचेच संकेत दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सुप्रसिद्ध कवयित्री आणि स्त्रीवादी लेखिका अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेले आमदार डॉ. नीलम गो-हे यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी ही भूमिका मांडली आहे.

दरम्यान, विधानसभेसह लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेना स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुण्याची लोकसभेची जागा कोण लढवणार यासाठी पुण्यातून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात काँग्रेस मार्गे परत शिवसेनेत आलेले विनायक निम्हण यांचं पक्षातील अस्तित्व सर्वसृत असून ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याने त्यांचा पत्ता आधीच कट झाल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.