Pimpri News : देशातील 110  स्मार्ट सिटीमधून नीळकंठ पोमण यांची ‘सीटी डेटा ऑफीसर’ म्हणून निवड

एमपीसी न्यूज – देशातील 110 स्मार्ट सिटीमधून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांची प्रथम ‘सीटी डेटा ऑफीसर’ म्हणून निवड झाली आहे.

याबाबत बोलताना नीळकंठ पोमण म्हणाले, ”दोन महिन्याचा कोर्स, सेमिनार होता. थींक बूक, केस स्टडी होत्या. सर्व निकषांची पूर्तता केली. त्यामुळे पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. यासाठी विभाग, अधिकारी, कर्मचा-यांना कष्ट घ्यावे लागते. दर आठवड्यात तीनवेळा व्हिडीओ कॉन्फरन्सला बसावे लागते. त्याचे सबमीशन, थिंक बूक, सेमीनार असतात. मी दोनवेळा प्रेझेंटेशन दिले होते. या निकषांच्या आधारे प्रथम ‘सीटी डेटा ऑफीसर’ म्हणून निवड झाली आहे. सरकारतर्फे विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला जातो”.

दरम्यान, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाला. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. कोरोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.