Nigdi News : नीलकंठ वासुदेव देशपांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक नीलकंठ वासुदेव देशपांडे (वय 87) यांचे वृद्धापकाळाने 26 एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे पुतणे सुभाष देशपांडे (ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाहक) आहेत.

नीलकंठ देशपांडे दक्षिण मध्य रेल्वेमधून 1989 मध्ये निवृत्त झाले होते. रेल्वे सेवेत असताना त्यांना हिंदीतील पत्रव्यवहाराबाबत विविध पारितोषिके मिळाली आहेत. याचबरोबर वृत्तपत्रातील लेखनाबद्दलही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

1988 मध्ये लेखन स्पर्धा पुरस्कार, 1991 साली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली यांचा पुरस्कार, 1992 साली मैत्रेय युवा मंडळ निबंध लेखन पुरस्कार, 1994 साली वृत्तपत्र लेखन संघटनेतर्फे फिरस्ती बाल पुरस्कार, 2000 साली इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे तर्फे लेखन स्पर्धा पारितोषिक, 2001 साली निगडी प्राधिकरण स्वर सागर कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता.

ते ज्येष्ठ हार्मोनियम वादक आप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य होते. लेखनाबरोबरच संगीत नाटकांची रसग्रहणे, संगीत मैफिलींची निवेदने तसेच वृत्तपत्र व मासिकांमध्ये ते लेखन करत असत. ते स्वतः उत्तम हार्मोनियम वादक होते. लहानपणी कै हरिभाऊ देशपांडे यांचे त्यांना सानिध्य लाभले होते. पिंपरी चिंचवड मध्ये अनेक संगीत मैफिल आणि कीर्तन कार्यक्रमाला ते साथसंगत करत होते. प्राधिकरणात संगीत प्रेमींचा त्यांचा मोठा गोतावळा होता. त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली आहेत. स्वामी समर्थ मठ प्राधिकरण आणि ज्ञानप्रबोधिनी निगडी या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.