_MPC_DIR_MPU_III

NEET Exam : NEET परीक्षा पुढे ढकलल्याची अफवा; बनावट परिपत्रकाबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे स्पष्टीकरण

NEET exams postponed; Explanation of National Examination Institute regarding fake circular

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा NEET UGची तारीख पुढे ढकलली असल्याचे एक पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने स्पष्टीकरण दिले आहे. हे व्हायरल होणारे परिपत्रक खोटे असून परीक्षा पुढे ढकलल्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून सांगण्यात आले आहे की, 15 जून 2020 ही तारीख असलेले एक बनावट सार्वजनिक परिपत्रक, ज्यावर, “नीट म्हणजेच, राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश प्रक्रिया चाचणी, UG जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दल” असा विषय लिहिला आहे, हे परिपत्रक विविध माध्यमे आणि समाज माध्यमांवरून पसरवले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

या बनावट परिपत्रकाची NTA ने गंभीर दाखल घेतली असून या बनावट परिपत्रकाचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी, पालक आणि एकूणच समाजाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असे खोटे परिपत्रक तयार करुन ते पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा NTA ने दिला आहे.

सर्व उमेदवार, पालक आणि नागरिकांना हे सूचित केले जात आहे की, अशा प्रकारचा कुठलाही निर्णय NTA अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही.

अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नका, ते पुढे पाठवू नका. सत्य आणि अधिकृत माहितीसाठी NTA च्या www.nta.ac.in आणि ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा, असे आवाहन NTA कडून करण्यात आले आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.