Neetu Kapoor Again Joins Silver Screen: अभिनेत्री नीतू कपूर करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन

Neetu Kapoor Again Joins Silver Screen राज मेहता दिग्दर्शित हा आगामी चित्रपट रोमॅण्टिक-कॉमेडी असून कियारा अडवाणी आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

एमपीसी न्यूज – आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवलेली 80 च्या दशकातील गुणी अभिनेत्री नीतू सिंग ही ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर नीतू कपूर झाली. पण त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला. नीतू यांनी लहानवयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पण लग्नानंतर त्या ब-याच काळ अभिनयापासून दूर होत्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी परत ऋषी यांच्या साथीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले. हा फक्त त्यांच्यासाठीच नाही तर रसिकांनाही मोठा धक्का होता.

परंतु, आता नीतू पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होणार आहेत. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, त्यांनी राज मेहता यांचा चित्रपट साईन केला असून लवकरच त्या रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकणार आहे.

‘यादों की बारात’, ‘कभी कभी’, ‘रफू चक्कर’, ‘खेल खेल में’, ‘अमर अकबर अँथनी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नीतू कपूर यांनी काम केलं होतं. मात्र लग्नानंतर त्यांनी कलाविश्वाला अलविदा म्हटले होते. परंतु आता लवकरच त्या एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात अभिनेता अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

राज मेहता दिग्दर्शित हा आगामी चित्रपट रोमॅण्टिक-कॉमेडी असून कियारा अडवाणी आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर नीतू कपूर आणि अनिल कपूर हे वरुणच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. परंतु, चित्रपट दिग्दर्शक राज मेहता आणि ऋषभ शर्मा हे चित्रपटावर काम करत आहेत. तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे करीना कपूर, अक्षय कुमार यांच्या गुड न्यूज या चित्रपटाचा हा सिक्वल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नीतू कपूर या 2013 मध्ये ‘बेशर्म’ या चित्रपटात अखेरच्या झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.