Neha Kakkar Birthday : ‘लंडन ठुमकदा’ फेम नेहावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

Neha Kakkar Birthday : Happy Birthday to 'London Thumkada' fame Neha

एमपीसी न्यूज  – आपल्या वेगळ्या गायनशैलीमुळे तरुणाईत लोकप्रिय झालेल्या गायिका नेहा कक्करचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लहानपण अत्यंत सामान्य परिस्थितीत काढलेल्या नेहाला तिच्या जुन्या दिवसांची अजूनही जाणीव आहे. ऋषिकेशमधील एका जुन्या घरात नेहाचा जन्म झाला. याच घरातील एका खोलीमध्ये टेबल मांडून तिची आई तेथे जेवण बनवत असे. आता याच शहरामध्ये नेहाने एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.

आपल्या बालपणाबद्दल अनेक गोष्टी नेहाने इंडियन आयडॉलच्या वेळी प्रेक्षकांना सांगितल्या. देवीच्या जगरातामध्ये म्हणजे जागरणात नेहाची बहीण सोनू गात असे. पुढे नेहादेखील त्यात गाऊ लागली. नेहाने लहानपणीचा एक किस्सा देखील सांगितला आहे. ‘मी चार वर्षांची असताना गाणे गाण्यास सुरुवात केली होती. वयाच्या १६ वर्षांपर्यंत मी भजन गात होते. जर तुम्ही माझ्या जागरणाचे फुटेज पाहिले तर तेथे देखील मी एका लहान मुलाप्रमाणे नाचत भजन गाताना दिसेल’ असे तिने म्हटले होते.

पुढे तिने अनेक गाणी गाजवली असून आपल्या वेगळ्या शैलीच्या गाण्याने तिने आज तरुणाईवर आपली मोहिनी घातली आहे.  नेहाचा जन्म ऋषिकेश येथे झाला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये आले. काही दिवसांपूर्वी नेहाची एक मुलाखत चर्चेत होती. या मुलाखतीमध्ये तिने माझे यश पाहून अनेकजण माझ्यावर जळतात असे म्हटले होते.

इंडियन आयडॉल या शो दरम्यान परीक्षक नेहा आणि सूत्रसंचालक आदित्य नारायणच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आदित्यचे वडिल उदीत नारायण यांना देखील मुलाखतींमध्ये नेहा आणि आदित्य विषयी प्रश्न विचारण्यात आले होते. पण हा सर्व शोचा एक भाग असल्याचे उदीत यांनी म्हटले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.