-MPC-TOP-MOST-BANNER-I

Neha Kakkar Leaves Social Media: नेहा कक्करचा सोशल मीडियाला काही काळापुरता अलविदा

Neha Kakkar leaves social media for a while सध्याच्या इतर सेलिब्रेटींप्रमाणे नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून अनेक वेळा ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहाने तिच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आत्तापर्यंत या विषयावर बऱ्याच टीकाटिप्पण्या झाल्या आहेत. खूप चर्चा झाल्या आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही संदिग्ध आहे. चित्रपटसृष्टीच्या काळ्या बाजूची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली. अनेकांनी आपली या विषयीची मते व्यक्त केली. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने नुकताच सोशल मीडियामधून काढता पाय घेतला आहे. मात्र तिने यासंबंधी लिहिलेल्या पोस्टमुळे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

सध्याच्या इतर सेलिब्रेटींप्रमाणे नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून अनेक वेळा ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहाने तिच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.

मात्र आता तिने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती दिली. तसंच मी इथून बाहेर पडते, पण मरणार नाही असं तिने म्हटलं आहे.

‘मी पुन्हा शांत झोपण्यासाठी जात आहे. ज्यावेळी जगात सगळं चांगलं घडू लागेल तेव्हा मला झोपेतून उठवा. या नव्या जगात जिथे प्रेम, आदर, स्वातंत्र्य, काळजी, मज्जा-मस्ती, स्वीकृती आणि चांगली माणसं असतील.

या जगात द्वेष, घराणेशाही, मत्सर, जजमेंट्, हिटलर्स, खून, आत्महत्या आणि वाईट माणसं या साऱ्यांना थारा नसेल. काळजी करु नका, मी मरणार नाहीये, फक्त काही काळासाठी या सगळ्यांपासून लांब जात आहे’, असं नेहाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणा-या नेहाच्या या कृतीचा अर्थ काय असावा याचीच सध्या चर्चा सुरु आहे. सोशल मीडियाचा अतिरेक होणे हे नेहाला आवडले नसावे. त्यातून बाहेर पडणे कठीण असले तरी ते हिताचे आहे असेच नेहाला वाटले असावे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn