Pune District Crime News : घरासमोर फटाके वाजवल्यामुळे शेजाऱ्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज :  फटाके वाजवण्याचा कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे . पुणे जिल्ह्यातील राहू गावात हा प्रकार घडला असून याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांवर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी नंदा सुनील कदम (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. दिलीप नवले, राहुल नवले, वैभव नवले आणि आबा नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे शेजारी आहेत. घटनेच्या दिवशी घरासमोर फटाके वाजवत होता. त्यावेळी वर नमूद केलेल्या आरोपींनी तू आमच्या घरासमोर फटाके का वाजवतो असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.