Nepal Ban On Indian News Tv Channels: नेपाळमध्ये डीडी न्यूजशिवाय सर्व भारतीय वृत्त वाहिन्यांवर बंदी

Nepal Ban Telecast Of All Indian News Tv Channels Except Dd News नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली भारतीय वृत्त वाहिन्यांवर बंदी घालून पुन्हा एकदा चीनच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत.

एमपीसी न्यूज- नेपाळने सीमावादानंतर आता भारतीय वृत्त वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. नेपाळने याबाबत कोणताही अधिकृत आदेश दिला नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु, नेपाळमधील केबल टीव्ही ऑपरेटर्सनी भारतीय वृत्त वाहिन्यांचे प्रसारण बंद केले आहे. नेपाळने बंदी घातलेल्या वाहिन्यांमध्ये डीडी न्यूजचा समावेश नाही.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली भारतीय वृत्त वाहिन्यांवर बंदी घालून पुन्हा एकदा चीनच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान चीननेही भारतीय वृत्त वाहिन्यांच्या प्रसारणास बंदी घातली होती. भारतीय वृत्त वाहिन्यांमुळे सीमेवर सुरु असलेल्या हालचालींची खरी माहिती लोकांना होईल या भीतीमुळे चीनने बंदी घातली होती.


पंतप्रधान ओली हे नेपाळच्या सत्तेवर राष्ट्रवादाच्या सहाय्याने राहू इच्छितात. त्यामुळे ते कधी नकाशा वाद तर कधी नागरिकता कायद्याच्या माध्यमातून भारताविरोधात कठोर पावले उचलत आहेत.

भारताकडून त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी नुकताच आरोप केला होता. तर चिनी राजदूतबरोबर वाढत असलेली त्यांची निकटता पाहता नेपाळमधूनच त्यांना विरोध सुरु झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.