Nepal Plane Crash : नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; 72 प्रवाशांसह विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नेपाळमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. (Nepal Plane Crash) या विमानात 72 प्रवासी होते. पोखराजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान यती एअरलाईन्स असल्याचे सांगितले जात आहे. या विमान अपघातामध्ये आतापपर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. 

या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. विमान अपघातामध्ये आतापपर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहे.

विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचं दिसतेय. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याचं समोर आले आहे. यामध्ये पाच भारतीय होते.

 

हवामान खराब असतानाही यती एअरलाइनच्या एटीआर-72 विमानाने उड्डाण केल्याचं समोर आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. पोखरा येथील सेती खोच येथे हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली. (Nepal Plane Crash)  बचावकार्य वेगात सुरु आहे. अनेकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.