Asian games : ट्वेंटी ट्वेंटी मध्ये नेपाळचा 314 धावांचा विश्वविक्रम; क्रिकेट मधील 5 विक्रम केले नावावर

एमपीसी न्यूज – चीन मधील हॉंगझाऊ येथे सुरु असलेल्या 19 व्या आशियाई (Asian games) क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात आज नवीन 5 विक्रम नेपाळने आपल्या नावे केले आहेत. नेपाळ विरुद्ध मंगोलिया अशा झालेल्या सामन्यात सांघिक विक्रमासह व्यक्तिगत विक्रमाचाही समावेश आहे.

MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग शेवटचा)

नाणेफेक जिंकून मंगोलीयाने प्रतःम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने मंगोलिया विरुद्ध खेळताना 20 षटकांमध्ये 3 विकेट्स च्या बदल्यात 314 धावांचे डोंगर उभे केले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यत कोणत्याही देशाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. तसेच 300 धावांचा टप्पा ओलांडणारा नेपाळ हा पहिलाच देश ठरला आहे.

नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने 34 बॉलमध्ये शतक झळकावत ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावे होता. कुशलने 50 बॉल मध्ये 137 नाबाद धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 12 षटकार आणि 8 चौकार लगावले आहेत.

तसेच नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंह याने देखील सवत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. त्याने अर्धशतक करण्यासाठी केवळ ९ बॉलचा सामना केला आहे. यामध्ये त्याने 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावत 10 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 520 होता. यासोबतच त्याने ट्वेंटी ट्वेंटी इतिहासातील वेगवान युवराज सिंघ च्या नावे असलेला 12 बॉल मधील अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला आहे.

314 धावा करतांना नेपाळने 26 षटकार आणि 14 चौकार लगावले आहेत. बदल्यात मंगोलियाचा संघ 13.1 षटकात 41 धावांमध्ये गारद झाला. नेपाळने मंगोलीयावर 273 धावांनी विजय मिळवला. ट्वेंटी ट्वेंटी इतिहासात अतापार्याचा हा सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय ठरला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.