Neral : नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला नसता तर माझे आयुष्य आळणी राहिले असते- डॉ श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज- पद्मश्री नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने 1 मे रोजी काव्यजागर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य समनव्यक सचिन इटकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे,  मुरलीधर साठे, रंगनाथ गोडगे पाटील, उद्धव कानडे, मुकुंददादा आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस याना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कृपेसह महाजन, धनाजी घोरपडे, ज्योत्स्ना चांदगुडे, समृद्धी सुर्वे, अशोक कोठारी याना नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्काराने गौरविण्यात आले.  नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला नसता तर माझे आयुष्य आळणी राहिले असते अशी भावना डॉ. सबनीस यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

यावेळी झालेल्या काव्य मैफिलीत पितांबर लोहार, इंद्रजित घुले, अनंत राऊत, मानसी चिटणीस, राजेंद्र वाघ यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. अध्यक्षस्थानी रवी पाईक होते. काव्यमैफिलींचे सूत्रसंचालन कवी भरत दौंडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कल्पना घारे, गणेश घारे व पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयवंत भोसले, सुरेश कंक, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हनुमंत देशमुख, राजेंद्र वाघ, अरुण गराडे, दिलीप वर्मा, प्रा. दिगंबर ढोकले यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.