नेस्ट – नावाप्रमाणेच सुरक्षित, मजबूत आणि सुंदर असा तळेगाव येथील सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शनचा गृहप्रकल्प

एमपीसी न्यूज- वास्तुशास्त्र हे प्राचीन शास्त्र असून या शास्त्रानुसार राहत्या घराला आनंदी बनवून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी या शास्त्राचा प्राचीन काळापासून उपयोग होत आला आहे. वास्तुशास्त्र हे फक्त घरापुरते अवलंबून नसते तर ते स्थल, काल, देश, विश्व पातळीवर अवलंबून असते. गणेश काकडे यांच्या सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शनच्या तळेगाव येथील नेस्ट या प्रकल्पात ज्या वास्तुवर सर्व इमारती उभ्या आहेत मुळात तीच जमीन वास्तुप्रमाणे संतुलित केली आहे. त्यामुळे इमारतीमधील प्रत्येक घराला या भूमी उर्जेचा निश्चित लाभ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदनिकेत उजेड, हवा अर्थात पंचमहाभूते कशी येतील याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच सिद्धीविनायक नेस्ट हा एक परिपूर्ण गृहप्रकल्प आहे. या वास्तूत आपल्याला सुख, संपत्ती, संतती, आरोग्य, ऐश्वर्य याचा नक्कीच लाभ होणार आहे. सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करणारा तळेगावातील गृहप्रकल्प म्हणजे सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शनचा नेस्ट हा प्रकल्प.

मागील सुमारे पंधरा वर्षांपासून ग्राहकांची आवड आणि त्यांचे सुखस्वास्थ जपणारी घरे बांधण्यात अग्रेसर असणारा तळेगावातील प्रसिद्ध ग्रुप म्हणून सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शनचे नाव घेतले जाते. ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ग्राहकांची आवड ओळखून त्यांच्या साठी उत्कृष्ट दर्जा असणारी व सर्व सुखसोयींनी युक्त अशी घरे बांधण्यात सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन ग्रुप अग्रगण्य आहे. नेस्ट हा असाच एक नावाप्रमाणेच घरट्यासारखा सुरक्षित, मजबूत आणि सुंदर गृहप्रकल्पाचे सध्या बांधकाम सुरु आहे. येथे चार इमारतींमध्ये वनबीएचके आणि टुबीएचके असे सुमारे ९६ सदनिका आहेत. सध्या यातील सुमारे 70% सदनिका विकल्या असून आता मोजक्याच सदनिका उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे लवकरात लवकर बुकींग करुन आपले मनपसंत घर निवडा. वनबीएचकेची किंमत 20 लाख रुपये आणि टुबीएचकेची किंमत 30 लाख रुपये अशी आहे. तळेगावात मध्यवर्ती ठिकाणी आणि निसर्गरम्य वातावरणात अगदी मध्यवस्तीत असलेल्या या प्रकल्पापासून तळेगाव स्टेशन, एमआयडीसी अत्यंत जवळ आहे. तसेच या प्रकल्पाची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. सर्व सोयींनी युक्त, सुशोभित प्रवेशद्वार आणि सुरक्षा केबिन, भूकंपरोधक आरसीसी स्ट्रक्चर, वॉटरप्रूफ केलेले बाहेरील प्लास्टर, बॅटरी बॅकअपसह लिफ्ट आदी सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी कधी एकदा घरी येतो असे आपल्याला होऊन जाते. घरी आल्यावर एक वेगळीच सुखद अनुभूती मिळते. आपलं घर जास्तीत जास्त उत्तम कसं असू शकेल, सुरक्षित कसं असू शकेल आणि बजेटमध्ये बसणारे कसे असेल याचाच विचार आपण सर्वप्रथम करतो. या सर्व गोष्टींचा विचार करुनच सिद्धीविनायक नेस्ट या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

तळेगावला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मोठा वारसा आहे. तसेच तळेगावची हवा अत्यंत आल्हाददायक अशी आहे. त्यामुळे फार पूर्वापासूनच तळेगावात घर ही एक जमेची बाजू मानले जाते. आता तर तळेगावचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात देखील तळेगाव अग्रेसर झाले आहे. त्यामुळे भविष्यकाळात सुरक्षित राहण्याचा व निरोगी व आनंदमय जीवनाचा विचार करायचा असेल तर त्याला तळेगावातील सिद्धीविनायक नेस्ट या प्रकल्पात गृहखरेदी करण्याचा त्वरीत विचार करा आणि येत्या पाडव्याला येथे गृहनोंदणी करा.

प्रकल्पाचा पत्ता – सिद्धीविनायक नेस्ट,
सीमको कॉलनी, मोहननगरजवळ,
तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
——————————————–
बुकींग ऑफिस – सुकुल,
स्वामी समर्थ नगर, तळेगाव – चाकण रस्ता,
तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि, पुणे.
फोन नं. – 7507662002

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.