Akurdi News : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आकुर्डीत साजरी

एमपीसी न्यूज: आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस नेताजींच्या प्रतिमेस समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी अजित अभ्यंकर, डॉ. सुरेश बेरी, अनिल रोहम, गणेश दराडे, अपर्णा दराडे, अमिन शेख, मनीषा सपकाळे, सूर्यकांत वेताळ, रिया सागवेकर, शेहनाज शेख यांच्यासह युवक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारताला ब्रिटीशांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी नेताजींनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. ते आशिया खंडातील एकमेव अलौकिक महापुरुष होते. त्यांनी युवाशक्तीला शिस्तबद्ध लढाईसाठी प्रेरणा दिली होती. जगाच्या इतिहासात मानवमुक्तीच्या लढ्यात आझाद हिंद सेनेचे नाव हे अजरामर आहे. कामगार शेतक-यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या नव्या लढाईसाठी नेताजींच्या विचाराने चळवळ चालवली पाहिजे, असे मत कैलास कदम यांनी यावेळेस व्यक्त केले.