Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 10, 309 नवे करोनाबाधित ; 6,165 जण करोनामुक्त

New 10,309 corona patients in State today, 6,165 patients cured.

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात राज्यात 10 हजार 309 नवे करोनाबाधित आढळून आले व 334 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर, दिलासादायक बाब म्हणजे 6 हजार 135 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 68 हजार 265 वर पोहचली आहे. यामध्ये 1 लाख 45 हजार 961 ॲक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले 3 लाख 5 हजार 521 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 16 हजार 476 जणांचा समावेश आहे.

 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 65.25 टक्के झाले आहे. तर, मृत्यू दर 3.52 टक्के आहे.

आज नोंदल्या गेलेल्या 334 मृत्यूंपैकी गेल्या 48 तासांमध्ये झालेले 242 आहेत. तर 60 गेल्या आठवड्याभरातले आहेत. उरलेले 32 त्यापूर्वी झालेले मृत्यू आहेत.

मुंबईत आज 1 हजार 125 नवे करोनाबाधित आढळले तर 42 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आज दिवसभरात 711 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या 1 लाख 19 हजार 225 वर पोहचली. यामध्ये 20 हजार 697 ॲक्टिव्ह रुग्ण, आतापर्यंत मृत्यू झालेल्या 6 हजार 588 जणांचा व करोनामुक्त झालेल्या 91 हजार 673 जणांचा समावेश आहे.

 

मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात 39,385 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 30,406 तर मुंबईत 20,679 सक्रिय रुग्णसंख्या आहे.

आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या  24 लाख 13 हजार 510 नमुन्यांपैकी 4 लाख 68 हजार 265 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सद्यस्थितीस राज्यात 9 लाख 43 हजार 658 जण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) व 36 हजार 446 जण संस्थात्मक विलगीकरणात मध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.