Pune : विधानसभा निवडणुकीत 1,34, 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार

आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिका-यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया व सुरक्षेचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज – आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचाा हक्क बजावणार आहे. यामध्ये युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे.लोकसभेनंतर तरुणांच्या मतदानात 60 हजारांवर वाढ झाली. त्यामुळे येत्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तब्बल 70 हजार कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यरत आहेत.

जिल्ह्यात एकूण 7920 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यंदा सर्व मतदान तळमजल्यावर घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तिथे वायरलेस आणि सॅटेलाईट फोनचा ही वापर करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनानेही निवडणुकीची तयारी पूर्ण केली. पुणे शहरात तब्बल 190 अतिसंवेनशील मतदान केंद्र आहेत. त्याचबरोबर 6 हजार 548 शस्त्र परवाना असून छाननी करुन शस्त्र ताब्यात घेणार आहेत. निवडणुकीसाठी तब्बल सहा हजार पेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. त्याचबरोबर 2115 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

तर पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडे तीन हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात 3 हजार 825 शस्त्र परवानाधारक आहेत. ते ही छाननी करुन ताब्यात घेण्यात येणार आहे. तर 59 तडीपार प्रस्ताव आहे. तर चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. मोक्काचे तीन प्रस्ताव असून 20 पिस्तूल जप्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.