Pimpri corona update : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 143 रुग्ण; 113 जणांना डिस्चार्ज

New 143 corona patients today in Pimpri Chinchwad city, 113 persons discharged.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 1) 143 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 87 हजार 883 झाली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 113 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 860 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 113 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 84 हजार 591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण मोशी (महिला 65 वर्ष) येथील आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 3 रुग्णांचे आज शहरात निदान झाले आहे. सध्या 197 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 632 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील 904 रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 379 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.