Maval Corona Update: नवे 15 रुग्ण, एकूण 365 पैकी 157 जण कोरोनामुक्त, 10 जणांचा मृत्यू

New 15 corona patients, 157 cured, 10 deaths.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या एकने वाढली असून दिवसभरात 15 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव,डोंगरवाडी (लोणावळा),सोमाटणे,वडगाव, परंदवडी, गहुंजे, शिरगांव, टाकवे, कामशेत, सुदुंबरे   येथील  रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

कामशेत, डोंगरवाडी (लोणावळा), टाकवे, शिरगांव, गहुंजे, परंदवडी व वडगाव येथे प्रत्येकी 01 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर सुदुंबरे येथे 02 तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथे प्रत्येकी  03 असे एकूण 15 रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत.

काल  आढळलेल्या नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या एकने वाढलेली दिसते. आज अखेर 02जण बरे झाल्याने त्यांना घरीसोडण्यात आले. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव दाभाडे प्रभाग 3, व्हिक्टोरिया सोसायटी रीयानो कॉलनी येथील 33 वर्षीय व्यक्ती,  प्रभाग क्र 8 पार्थ सोसायटी, जव्हेरी कॉलनी 50 वर्षीय हाॅस्पिटलमध्ये आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्यावर लागण, प्रभाग 4 इंद्रायणी  कॉलनी 34 वर्षीय व्यक्ती सर्दी खोकला लक्षणे,  प्रभाग 9 जिजामाता चौक 42 वर्षीय महिला आदींचा काल स्वॅब घेण्यात आला होता. आज कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आजअखेर तालुक्यातील कोरोनाबधित शहरी (तळेगाव 110+वडगाव 12+ लोणावळा 28) 150 व ग्रामीण 215 अशी मिळून रुग्णांची संख्या 365 झाली असून यापैकी 10 जणांचा मृत्यू तर 157 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 198 असून यापैकी 135 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 63 जणांवर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 110 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 60 जण उपचार घेत आहेत. पैकी 31 जण गृहविलगीकरणात आहेत अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.