Maval Corona Update : मावळ तालुक्यात सोमवारी कोरोनाचे 17 नवीन रुग्ण

New 17 corona patients in Maval on Monday.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी,  दि. 7) कोरोनाचे 17 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 391 झाली आहे. तर दिवसभरात 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सोमवारी लोणावळा शहर (पुरुष, 70 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 9 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 8 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत, काले येथील प्रत्येकी दोन, टाकवे बु., सोमाटणे, वळख, नाणे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 6, लोणावळा शहरात 3 रुग्ण आढळले आहेत. वडगावमध्ये आज एकही रुग्णाची नोंद नाही.

एकूण 2 हजार 391 रुग्णांमध्ये सध्या 600 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 696 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 790, लोणावळा नगरपरिषद 369 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 159 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 73 रुग्ण आढळून आले आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.