Chakan News : खेड मध्ये नवीन 43 कोरोना बाधित रुग्ण

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात गुरुवारी 19 गावे आणि 3 पालिकांमध्ये 43 रुग्ण मिळून आले आहेत.  तर बिरदवडी येथील 40 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गुरुवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 99 झाला आहे. यापैकी 32 हजार 284 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 343 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी एका मृत्यूने 472 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 33 रुग्ण, चाकण 5, आळंदी 1, राजगुरुनगर 4 असे एकुण 43 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे- बहुळ 1, बिरदवडी 1, सातकरस्थळ 1, चिंचोशी 1, ढोरे भांबुरवाडी 1,  पाईट 1,  शिरोली 1, येलवाडी 1, वासुली 1,  मरकळ 1, खालुंब्रे 1, खरपुडी खु. 1, चिंबळी 2, कडूस 2, केळगाव 2, कोरेगाव खु. 2, महाळुंगे 3,शेलपिंपळगाव 3,वाफगाव 7, असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.  

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.