Pune: कोरोनाचे 617 रुग्ण, 482 जणांना डिस्चार्ज, 5 जणांचा मृत्यू

New 617 Corona patients in a day, 482 persons discharged, 5 deaths.

0

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सोमवारी 617 रुग्ण नव्याने आढळले. तर, दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. आज 482 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 5 जणांचा मृत्यू झाला.

यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत 618 जणांचा मृत्यू झाला आहे. 333 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 61 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे आता 16 हजार 742 रुग्ण झाले आहेत. पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 6 हजार 195 आहे.

आतापर्यंत 9 हजार 929 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज कोरोनाच्या 4 हजार 38 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

धनकवडीतील 76 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, नांदेड फाटा परिसरातील 55 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 47 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 68 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 60 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आज तर, तब्बल 4 हजार 38 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मात्र, पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोना रुग्ण लवकर आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करणे सोपे होते. पूर्ण शहरातील 9 हजार 929 रुगण कोरोनातून बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like