_MPC_DIR_MPU_III

Maharashtra Corona Update : राज्यात आज 9,181 नवे रुग्ण तर 6,711 जण कोरोनामुक्त 

New 9,181 corona patients in state today; 6,711 persons corona-free.

एमपीसी न्यूज – राज्यात आज  दिवसभरात 9 हजार 181 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 6 हजार 711 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

_MPC_DIR_MPU_IV

राज्यातील एकूण  5 लाख 24 हजार 513 रुग्णांपैकी आजवर 3 लाख 58 हजार 421 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 47 हजार 735 सक्रिय रुग्ण आहेत.

दिवसभरात आज 293 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 18 हजार 050 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने हि आकडेवारी जाहीर केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.33 टक्के  एवढे आहे. राज्यात आज 293 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.44 टक्के एवढा आहे

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 लाख 73 हजार 520 नमुन्यांपैकी 5 लाख 24 हजार 521 नमुने पॉझिटिव्ह (18.91 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 01 हजार 268 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 521 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.