Pune : पुणे ग्रामीणच्या चार मतदारसंघासाठी भाजपकडून 37 जण इच्छुक

शिरुर-हवेलीसाठी 10, जुन्नरसाठी- 11, आंबेगाव तालुक्यातून 9 तर खेड-आळंदी मतदार संघासाठी एकूण 7 जण इच्छूक

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने आज आळंदी येथे जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर हवेली या विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती राज्याचे राज्यमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी घेतल्या. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, धर्मेंद्र खांडरे, अविनाश बवरे तसेच चंद्रकांत शेटे व सुशील सैंदाणे उपस्थित होते.

शिरूर-हवेली मतदारसंघासाठी मुलाखत दिलेल्या इच्छुकांची नावे
आमदार बाबूराव पाचर्णे, दादासाहेब सातव, रोहिदासशेठ उंद्रे, सुनील कांचन पाटील, भगवान शेळके , गणेश कुटे, पुनमताई चौधरी,
शिवाजीराव भुजबळ व शाम चकोर
एकूण 10 इच्छुक

जुन्नर तालुका विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिलेल्या इच्छुकांची नावे
भगवान शेठ घोलप, मधुकर काठे, संतोष तांबे, काशिनाथ आवटे, उल्हास नवले , स्वातीताई घोलप, अमोल शिंदे, वैशालीताई हांडे, रोहिदास भोंडवे, अरुण कबाडी, जयदास साळवे
एकूण इच्छुक 11

आंबेगाव तालुका विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिलेली इच्छुकांची नावे
संजय थोरात, गणेश ताठे, डॉक्टर ताराचंद कराळे, जयसिंगराव एरंडे, अनिल नवले, सतीश पाचंगे, भानुदास काळे, ॲडवोकेट सुरेश पलांडे, विजयराव पवार
एकूण इच्छुक 9

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची नावे
अतुल देशमुख, रामदास मेदनकर, ह भ प पांडुरंग महाराज शितोळे, राहुल चिताळकर, दिलीप मेदगे, कांतीलाल घुंडरे, राजन परदेशी
एकूण इच्छुक 7

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.