Pimpri : प्लास्टिक पिशवी वापरणा-या व्यापा-यांवर कारवाई : ८० हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – आज  सलग तीन दिवसांचे सुट्टीचे औचित्य साधून पिंपरी रिव्हर रोड व पिंपरी मार्केटमधील काही भाग येथे बंदी असलेल्या प्लास्टिकबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ऐंशी हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक  बेद राजू  यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरिक्षक  सुरेश चन्नाल,  सदाशिव पुजारी,  शेखर निंबाळकर,  योगेश फल्ले,  शांताराम माने,  सतिश इंगेवाड,  बाबासाहेब राठोड; तसेच आरोग्य मुकादम  पुखराज रेणवा, आरोग्य कर्मचारी प्रशांत पवार, स्वदेश साळुंके, अरूण राऊत, सचिन छपरीबंद, विशाल दाभाडे, शामराव ठाकर, अजय साबळे, विकास शिंदे, शाम कोटियाना, प्रभाकर शिंदे, शैलेश भोसले, दत्तात्रय ढगे, मंगेश बाबर, सागर जाधव, अमर वाल्मिकी, विनायक सौदा, सागर विटकर; वाहनचालक  चंद्रसेन बोराटे, हनुमंत सुरवसे, रविंद्र निला यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

त्यामध्ये सदगुरु किराणा, भावना इमिटेशन्स, पुजा ट्रेडर्स, गुडविल कलेक्शन, आर. आर. कॉफी विहार, रेखा एंटरप्राइजेस, पवन प्रोडक्ट्स, बालाजी हाऊस किपिंग, सागर ट्रेडर्स, साई फरसाण, जयशंकर डेअरी, अफगाण ड्रायफ्रुट, जगदंब ट्रेडर्स, के.डी.एस., महालक्ष्मी शॉपी, बालाजी शॉपी यांचेवर दंडात्मक कारवाई करून एकूण ७३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व प्रत्येकी ५,०००/- रूपये प्रमाणे एकूण ८०,०००/- रूपये दंड वसूल करण्यात आला.

याव्यतिरिक्त ३ दुकाने गोविंद ड्रायफ्रूट, झुलेलाल ड्रायफ्रूट, कैलास क्रॉकरी या दुकानांनी प्लास्टिक जप्त करण्यास विरोध केला व दंड भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या दरम्यान व्यापा-यांनी जमाव गोळा करून कारवाईस विरोध केल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तद्नंतर काही दुकानांवर कारवाई केल्यावर व्यापाऱ्यांनी पुढील सात दिवसांत सर्व असलेले प्लास्टिक नष्ट करून यापुढे प्लास्टिक न वापरणेबाबत आश्वासन दिल्यावर कारवाई थांबविण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.