BNR-HDR-TOP-Mobile

Maval : आमराईच्या संरक्षण तारेत सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाच्या धक्क्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

आमराईतील आंबे खाण्यासाठी कोणीही येऊ नये म्हणून असे जीवघेणे उपाय करणे कितपत योग्य ?

एमपीसी न्यूज- इंदोरीतील पिंजणमळा कांदेवस्ती येथे आमराईतून कोणी आंबे घेऊन जाऊ नये यासाठी संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह 240 वोल्ट रेक्टिफायरच्या मदतीन 24 वोल्ट करून सोडण्यात आला. यासाठी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हा प्रवाह सोडण्यात आला होता. मात्र, या तारांनी पावसामुळे पडलेले आंबे वेचण्यासाठी आलेल्या एका 11 वर्षीय मुलीचा या विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी (दि.8) सकाळी सहा वाजता घडली. 

पिंकी बापू केदारी (वय 11, रा. इंदोरी, ठाकरवस्ती) असे मयत मुलीचे नाव असून ती आदिवासी ठाकर समाजातील होती.

इंदोरी परिसरात दि.७ व दि.८ शनिवार रात्री  पाऊस झाला. जोरदार वारे व पाऊस झाल्यामुळे आमराईमधील आंबे खाली पडतात ते वेचण्यासाठी मयत पिंकी केदारी व तिचे २ छोटे भावंड इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते. तेथील सरंक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता. हे पिंकीला समजले नाही व विजेचा धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला.

तळेगाव एमआईडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला गेला नाही. पिंकी केदारी ही इंदोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत होती. हुशार कष्टाळू होतकरु मुलगी म्हणून तिची ओळख होती. आंबे संरक्षित करण्याच्या उद्देशाने जीवघेणा विजेचा प्रवाह सोडने किती योग्य आहे ? एका निर्दोष मुलीचा थोड्या फार आंब्यांसाठी जीव गेला. या घटनेला जबाबदार कोण ? एक गरीब ठाकर आदिवासी समाजातील मुलगी असल्यामुळे पोलीस प्रशासन दोषीवर कठोर कारवाई करतील, अशी आशा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

HB_POST_END_FTR-A2