Bhosari : बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी आयोजित परीक्षेत श्रद्धा खैरे पुणे जिल्हयात प्रथम  

एमपीसी  न्यूज – शिवसेना व युवासेना भोसरी विधानसभा आयोजित बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस. अकादमी स्पर्धा परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शिरुरमधील श्रद्धा खैरे प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातून १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस. अकादमी आणि शिवउद्योग प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी, मोशी येथील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ३८४ विद्यार्थी सहभागी झाले होते व संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून शिरुरच्या श्रद्धा खैरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नवनाथ गुलधने, रणजित वाघमोडे, निलेश भोसले, कुंदन झिंगरे, शुभांगी वाळुंज, श्रीकांत चौधरी, प्रविण खाडे, मेघना गोरखा, तेजश्री सावंत, तेजस कवडे, प्रविण गुरव, प्रियांका वाळके, हर्षल सोनवणे, संदेश डाफळे हे १५ विद्यार्थी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत.

शिवसेना उपनेते, शिरुर लोकसभेचे प्रथम खासदार शिवाजी आढळराव पाटील, उपनेते विजय कदम, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम व सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली व युवासेना जिल्हप्रमुख सूरज लांडगे, जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवासेना अधिकारी कुनाल जगनाडे, अमित शिंदे, विश्वनाथ टेमगिरे यांनी परीक्षा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.