New Bond Movie: नवीन बॉन्डपट नोव्हेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट 12 नोव्हेंबरला युनायटेड किंगडम आणि 20 नोव्हेंबरला अमेरिकेत प्रदर्शित होईल. अलीकडेच चित्रपटाचे एक पोस्टरही रिलीज झाले होते.

एमपीसी न्यूज – हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित नव्या बॉन्डपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला आहे. ‘नो टाइम टू डाई’ या नावाचा हा बॉन्डपट ब-याच कालावधीनंतर चर्चेत आला आहे. सध्याचा लोकप्रिय बॉन्ड डॅनियल क्रेग या चित्रपटात जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा नवीन ट्रेलरदेखील अ‍ॅक्शनने भरलेला आहे आणि शेवटपर्यंत तो खिळवून ठेवतो.

ट्रेलरमध्ये डॅनियल क्रेग एका बाजूला जोरदार अ‍ॅक्शन करताना दिसला आहे, तर ट्रेलरमध्ये रम्मी मलेकची झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रम्मी मालेक खलनायकाची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये त्यांच्याबद्दल फारशी माहिती दिली गेलेली नाही. पण अशी अपेक्षा आहे की रम्मी पुन्हा एकदा दर्शकांची मने जिंकू शकेल.
ट्रेलरमध्ये रम्मीशिवाय अना डी आर्मासही एकदम किलर लुकमध्ये दिसत आहे. ती तिच्या सौंदर्याने लोकांमध्ये आग लावेल अशी अटकळ आहे.

हा चित्रपट 12 नोव्हेंबरला युनायटेड किंगडम आणि 20 नोव्हेंबरला अमेरिकेत प्रदर्शित होईल. अलीकडेच चित्रपटाचे एक पोस्टरही रिलीज झाले होते. ज्यामध्ये डॅनियल क्रेग एक लहान पिस्तूल घेऊन दिसला होता. ब्लॅक सूटमध्ये क्रेग नेहमीसारखा मोहक दिसत होता. पोस्टरसोबत असलेले कॅप्शन- ‘मॅन ऑन मिशन.’ डाऊन टाईम टू डाय चे नवीन पोस्टर पहा. येत्या नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट चुकवू नका हे नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.