Bhosari : कंपनी मालकिणीचा विनयभंग; कामगार गजाआड

एमपीसी न्यूज – कंपनी मालकिणीचा हात पकडून मिठ्ठी मारून विनयभंग करणार्‍या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी सहा वाजता एमआयडीसीतील एका कंपनीत घडला.

हुसेनसाब निसारअहमद शेख (वय-27, रा. तळवडे, मुळ कर्नाटक), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीची भोसरी एमआयडीसी येथे कंपनी आहे. फिर्यादी शुक्रवारी कंपनीत गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी शेखने ’क्या मॅडम आज सुबह सुबह कंपनी आये हो’ असे म्हणत डावा हात पकडून मिठ्ठी मारून त्यांचा विनयभंग केला. फौजदार बांबळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.