Pune : झोमॅटो फूडपांडासह अन्य अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांना नोटीस

पुढील आठवड्यात व्यवसाय बंदीची कारवाई

886

एमपीसी न्यूज – झोमॅटो, फूडपांडासह ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 113 कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

HB_POST_INPOST_R_A

ई कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरूवात झाली आहे. अॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून या कंपन्या शासनाची परवानगी न घेता खाद्य पदार्थ पुरवत होत्या. यातील काही कंपन्या पदार्थांचा ताजेपणा जपत नव्हत्या. भेसळयुक्त पदार्थ विकत होत्या, असे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली. बृहन्मुंबई विभागात तब्ब्ल 113 आस्थापना अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचे दिसून आले. यातल्या अनेक कंपन्या घरपोच सेवा देत होत्या. तथापी त्यांनी खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण व परवाने घेतले नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात ही कारवाई करण्यात आली.

बापट पुढे म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे व अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 347 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातील 113 ठिकाणी नोंदणी न करताच खाद्यपदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले.

स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या अॅपच्या माध्यमातून हा गैरव्यवहार होत होता. स्विगी अॅपच्या माध्यमातून 85 विक्रेते इ सेवा देत होते. तर झोमॅटो अॅपच्या माध्यमातून 50 विक्रेते घरपोच पदार्थ देत होते. फुडपांडा आणि उबर इट्स या अॅपच्या माध्यमातून अनुक्रमे 3 व 2 विक्रेते खाद्यपदार्थ देत होते. या सर्वांना आज नोटीसा देण्यात आल्या. पुढील आठवड्यात त्यांच्यावर व्यवसाय बंदीची कारवाई केली जाईल.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: