Vadgaon Maval : वडगावमध्ये शुक्रवारपासून नगराध्यक्ष चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२०

0

एमपीसी न्यूज – मोरया ढोल ताशा पथकाच्या वतीने शुक्रवार (दि.१४) ते रविवार (दि.१६) दरम्यान नगराध्यक्ष चषक भव्य क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे. २०२० श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ६ वा. नगरविकास, ऊर्जा, मदत, पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कृषी, सहकार, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, क्रीडा, उद्योग, खनिकर्म पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, काँग्रेस युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे, खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, आमदार संजय जगताप, युवानेते पार्थ पवार आदी मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती प्रथम नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली.

याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, वेस्टन घाट रनिंग फाऊंडेशन, राष्ट्रीय खेळाडू हर्षदा गरुड, रुचिक ढोरे, महेश असवले, पांडुरंग गायकवाड आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

बक्षीस वितरण रविवार (दि.१६) सायंकाळी ७ वा. होणार आहे. मावळ तालुका मर्यादित जोर मारणे स्पर्धा शुक्रवार (दि.१४) सायंकाळी ५ वा., पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा मर्यादित वेटलिफ्टिंग स्पर्धा शनिवार (दि.१५) व रविवार (दि.१६) सकाळी ७ वा., मावळ तालुका मॅरेथॉन संघटनेच्या मान्यतेने मावळ तालुका मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि.१६) सकाळी ८ वा.,

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मावळ तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धा शुक्रवार (दि.१४), शनिवार (दि.१५) व रविवार (दि.१६) दुपारी ३ वा. मुलींचा प्रेक्षणीय सामना,

वडगाव मावळ मर्यादित नगराध्यक्ष चषक ओल्ड इज गोल्ड व ज्येष्ठ व कुमार गट फुल पिच क्रिकेट स्पर्धा कुमार गट शुक्रवार (दि.१४) व शनिवार (दि.१५) सकाळी ८:३० वा. व वरिष्ठ गट रविवार (दि.१६) सकाळी ८:३० वा. होणार आहेत.

याप्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष गणेश अप्पा ढोरे, भाजपाचे प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, ज्येष्ठ नेते मंगेश काका ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, माजी सरपंच तुकाराम तथा बुवा ढोरे, मावळ मनसे अध्यक्ष रूपेश म्हाळसकर सह सन्माननीय नगरसेवक राहुल ढोरे, राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, चंद्रजित वाघमारे, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, शामराव ढोरे, दशरथ केंगले, शारदा ढोरे, प्रमिला बाफना, पूनम जाधव, पूजा वहिले, माया चव्हाण, अर्चना म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे आदींसह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like