City pride : न्यू सिटी प्राईड  इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ‘महापरिनिर्वाण’ दिन साजरा

 एमपीसी न्यूज रहाटणी येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले (City pride) एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज (मंगळवारी) महापरिनिर्वान दिनसाजरा करण्यात आला.

या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे ज्योती वडदरे ,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी पुणे )चे समतादूत संगीता शहाडे व प्रशांत कुलकर्णी , सामाजिक कार्यकर्ते  तात्या शिनगारे,व्यवसाईक रामभाऊ खंडागळे हे उपस्थित होते.

Bhosari News : मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये स्पोर्ट डे साजरा

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शन केले, अरुण चाबुकस्वार सरांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना असे सांगितले कि,परमपुज्य,’बोधिसत्व, महामानव,युगपुरुष,घटनापती,महाविद्वान,दलितांचे कैवारी,स्त्री उद्धारक – जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तर तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो असे बाबासाहेबांचे शब्द आहेत.”

या वेळी इयत्ता आठवीच्या  लुबिनी माळगे, जगताप समृद्धी  या विद्यार्थिनींनी भाषण केले व तसेच सहशिक्षिका प्रियंका शाबादे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.(City pride) इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा गायला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका निशा पवार यांनी केले व आभार उर्मिला ठोंबरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.